Rohit Pawar : अजित पवार यांच्या पक्षातच गटबाजी; भाजप फक्त.., रोहित पवारांचा मोठा दावा
Rohit Pawar Statement On Ajit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज अजित पवार यांच्या पक्षाबद्दल आखी मोठे दावे केलेले असून यावेळी भाजपवर देखील टीका केली आहे.
अजित पवार यांच्या पक्षातच गटबाजी सुरू असल्याचं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हंटलं आहे. दादांवर आरोप होत असताना कोणी बोलायला समोर येत नाही. भाजप फक्त तमाशा बघत आहे, असं वक्तव्य देखील रोहित पवार यांनी केलं आहे.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षासाठी फक्त ते एकटेच काम करत असतील तर त्यांच्या पक्षाचे बाकीचे नेते काय करतात? अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांवर जर कोणी बोलत असेल तर त्यावेळी त्यात बोलायला कोणी येत नाही. पण हेच दुसऱ्याच्या बाबतीतला काही विषय असेल तर त्यात बोलायला त्यांचे मोठे मोठे नेते येतात. म्हणजे त्यांच्या पक्षातच अंतर्गत गट पडले आहेत असं म्हणावं लागेल. त्यांना त्यांच्याच पक्षात काय चाललं आहे हे कळत नसेल तर त्यावर आम्ही काय वक्तव्य करणार आहे? असा सवालही यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

