‘कुणी तरी पुडी सोडली पण आम्ही 100 टक्के…’, उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांची दिल्लीत मोठी कबुली
एकूण नऊ खासदार आमच्या संपर्कात आहेत, असं सामंत यांनी सांगितल्यानंतर ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वच्या सर्व खासदारांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत. आम्ही कोणत्याही वेगळ्या पक्षात जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
ठाकरे गटाचे अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. टप्प्याटप्प्याने आमच्याकडे येणार असा दावा शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केला होता. तर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचाही दावा केला होता. दरम्यान, ठाकरेंचे एकूण नऊ खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा सामंत यांनी केल्यानंतर ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि १०० टक्के ठाकरेंसोबत राहणार असल्याचे म्हणत एकमुखाने ग्वाही दिली. या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, अरविंद सावंत, अनिल देशाई, संजय जाधव हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत अरविंद सावंत म्हणाले, आम्हाला कुणाचाही फोन आलेला नाही. फोन आल्याच्या बातम्या खोट्या आहेत. काही चढउतार होऊ द्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबतच आहोत. सकाळपासून बातम्या पसरवल्या जात आहे. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ज्यांच्यात एकमत नाही. विसंवाद आहे. सरकारमध्ये येऊनही रोज बातम्या येत आहे. त्यामुळे चर्चेचा विषय दुसरीकडे वळवण्यासाठी कुणी तरी पुडी सोडली आहे. ज्यांचे सरकारमध्ये गंभीर वाद सुरू आहे. त्यातून चर्चा दुसरीकडे वळवावी हा प्रयत्न केला जात असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले. बघा काय दिली ठाकरेंच्या खासदारांनी कबुली?
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

