VIDEO : Rupali Cahkankar | मुंबईत बलात्कार पीडितेचा मृत्यू, रुपाली चाकणकरांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा आज (शनिवारी) राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती.

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा आज (शनिवारी) राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणावर आता रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रूपाली चाकणकर म्हटंल्या की, या आरोपींवर कडक कारवाई होईलच मात्र, लहान वयातच मुलांना संस्कार करणे गरजेचे आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI