AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana | नाच्या पोरांसारखा भाजप बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे आश्चर्यच : सामना

Saamana | नाच्या पोरांसारखा भाजप बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे आश्चर्यच : सामना

| Updated on: Apr 25, 2022 | 11:46 AM
Share

किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी (Kirit Somaiya Car attack) कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं. त्याला सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आलंय. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर भाजपची मळमळ बाहेर पडली. राणा दाम्पत्याचे गुन्हे हे फसवाफसवी आणि अफरातफरीचे आहेत, असाही टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला.

शिवसेनेचं (Shiv sena) मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून (Saamana Editorial) राणा दाम्पत्य आणि हनुमान चालिसेवरुन सुरु असलेल्या घडामोडींवर निशाणा साधण्यात आला आहे. दैनिक सामानाच्या अग्रलेखातून ‘घोटाळेबाजांचे हिंदुत्व आणि नुसताच थयथयाट’ या शिर्षकाखाली भाजपनं ऑफर दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. ठाकरे सरकारविरुद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा, अशी ऑफर बाजारात आलेली दिसते, असं म्हणत सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. भाजपवाले चोर लफंग्यांचे समर्थन करत असल्याचीही टीका यावेळी करण्यात आली आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी (Kirit Somaiya Car attack) कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं. त्याला सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आलंय. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर भाजपची मळमळ बाहेर पडली. राणा दाम्पत्याचे गुन्हे हे फसवाफसवी आणि अफरातफरीचे आहेत, असाही टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला.