शिंदेंसह 40 आमदार धुंदीत, फडणवीसांना महाराष्ट्रातील अधः पतन दिसतं नाही?; एमपीएससी आंदोलन आणि सरकारच्या निर्णयावर सामनातून भाष्य
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. त्यावर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. सरकारवरही टीका करण्यात आली आहे. पाहा...
मुंबई : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र तोडगा निघू शकला नाही. त्यावर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. “एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धत 2023 पासून लागू करायची की 2025 पासून, हा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेऊ शकले नाहीत व आजही त्यांची बुद्धी गोंधळलेल्या अवस्थेत आहे . हे प्रश्न निवडणूक आयोगाकडेच पाठवायला हवेत , असे बोलण्यापर्यंत त्यांना बुद्धीचे अजीर्ण झाले . महाराष्ट्र हे सर्व उघडय़ा डोळय़ाने पाहत आहे . मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची नशा चढली . ते व त्यांचे चाळीस लोक त्याच धुंदीत आहेत , पण बुद्धीचे ‘ गोपीचंद ‘ छाप पीक काढणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचे काय ? त्यांना महाराष्ट्रातील हे अधःपतन दिसते की नाही ? की ‘ सब घोडे बारा टके ‘ या न्यायानेच सगळे चालले आहे ? चालायचेच . चालू द्या . किती काळ चालवायचे ते पाहूच!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली

