Saamana Editorial Video : ‘…यांच्या विजयाचा बाप लावारिस’, विधानसभेतील कथित बोगस मतदानावर ‘सामना’तून हल्लाबोल
राज्यातील प्रत्येक विधानसभेत 25 ते 30 हजारांचे बेनामी मतदान झालं असल्याचे म्हणत विधानसभेला झालेल्या मतदानावर सामनातून आक्षेप घेण्यात आला आहे. बघा नेमकं काय म्हटलंय?
विधानसभा निवडणुकीतील कथित बोगस मतदानावर सामना या वृत्तपत्रातून टीका करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदार नोंदणीपेक्षा मतदान जास्त कसे झाले? असं म्हणत बोगस मतदानावर सामनातून सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तर राज्यातील प्रत्येक विधानसभेत 25 ते 30 हजारांचे बेनामी मतदान झालं असल्याचे म्हणत विधानसभेला झालेल्या मतदानावर सामनातून आक्षेप घेण्यात आला आहे. ‘विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदार नोंदणीपेक्षा मतदान जास्त कसे झाले? एखाद्या बूथवर 411 मतदारांनी मते टाकली व ईव्हीएम उघडताच 522 मते कशी? महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 25-30 हजारांचे बेनामी, अनौरस, लावारीस मतदान मोजले गेले. हे कसे घडले?’, असे एक न अनेक सवाल समानाच्या संपादकीयमधून करण्यात आले आहेत. तर महायुतीच्या विजयाचा बाप लावारीस असेल तर ही निवडणूक आणि त्यांचा विजय गैरसंविधानिक ठरतो, असे म्हणत सरकारवरच टीकास्त्र डागण्यात आलंय. पुढे असेही म्हटलंय की, हे सगळे टाहो फोडून सांगितले जात असताना राष्ट्रपती भवनाच्या भिंती कठोरपणे लोकशाही संविधानाची हत्या पाहत राहिल्या. त्याच राष्ट्रपती भवनातून संविधान सभेच्या प्रजासत्ताक मूल्यांवर देशाला संदेश मिळाला म्हणून आश्चर्य वाटले. महाराष्ट्रातील लावारीस मतदान हे संविधानाच्या कोणत्या मूल्यात बसते ते आधी सांगा, असंही समनातून म्हटलंय.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

