AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamna Editorial | दिल्लीश्वरांनी दिलदारी दाखवावी, सामनाच्या अग्रलेखातून पूरपरिस्थितीवर भाष्य

Saamna Editorial | दिल्लीश्वरांनी दिलदारी दाखवावी, सामनाच्या अग्रलेखातून पूरपरिस्थितीवर भाष्य

| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 8:42 AM
Share

तळीये गावातील लोकांचे पुनर्वसन वेळीच झाले असते तर इतकी मोठी मनुष्यहानी टाळता आली असती, असे आजचा विरोधी पक्ष सांगत आहे. पण याच विरोधी पक्षाच्या हाती पाचेक वर्षे चांगली सत्ता होतीच. त्यांनाही अशा गावांचे पुनर्वसन करता आले असते.

महाराष्ट्रातील 15 जिल्हय़ांना महाप्रलयाचा जबरदस्त फटका बसला आहे. या सर्व संकटांतून बाहेर पडण्यासाठी राज्याला हजारो हातांचे बळ लागेल. प्रशासनाने आतापर्यंत राज्यातील किमान दीड लाख लोकांना पुराच्या वेढय़ातून सुखरूप बाहेर काढले आहे. लोकांनी आपलं घरे, व्यवसाय, संसार, कपडे-धान्य गमावले आहे. त्यांना सहस्र हातांनी मदत व्हायला हवी. राज्य सरकार मदत करीतच आहे, पण मुंबईतील श्रीमंतांनी, ज्यांची ज्यांची पत आणि ऐपत आहे त्यांनी तसेच खास करून आपल्या प्रिय दिल्लीश्वरांनी यावेळी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे हीच विनंती! असे शिवसेनेनं यात म्हटलं आहे.

तळीये गावातील लोकांचे पुनर्वसन वेळीच झाले असते तर इतकी मोठी मनुष्यहानी टाळता आली असती, असे आजचा विरोधी पक्ष सांगत आहे. पण याच विरोधी पक्षाच्या हाती पाचेक वर्षे चांगली सत्ता होतीच. त्यांनाही अशा गावांचे पुनर्वसन करता आले असते. पण गावकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात व असे काही भयंकर घडले की, मग डोंगर, दऱयाखोऱयांतील गावांचा प्रश्न ऐरणीवर येतो. कधी तरी या संकटांवर मात करण्याचे धोरण सरकारला आखावेच लागेल. लोक सरकारे निवडून देतात.