शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट… राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी अर्ज भरला.

याचवेळी सचिन अहिर यांनी माननीय उद्धव ठाकरे साहेब यांना पत्र पाठवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा दिला. आपल्या पत्रात त्यांनी भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस तसेच बृहन्मुंबई बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. “आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे मी पक्ष आणि पदांचा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, संजय शिरसाट यांनी सचिन अहिर यांनी पक्षांतर केले नसून शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काळात ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Published on: Jun 30, 2026 02:19 PM
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...