Salman Khan : बॉलिवूडच्या भाईजानला ‘या’ तीन मोठ्या आजारानं ग्रासलं, सलमान खाननेच केला मोठा खुलासा
सलमान खान म्हणाला, मला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ब्रेन एन्युरिझम आणि एव्ही मॅलफॉर्मेशन सारख्या गंभीर समस्या आहेत, तरीही मी काम करत असल्याचे त्याने द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये सांगितले आहे.
देशातील सेलिब्रिटींच्या फिटनेसची जेव्हा चर्चा होते तेव्हा सर्वात पहिले नाव बॉलिवूड विश्वातील भाईजान सलमान खानचं नाव घेतलं जातं. मात्र याच अभिनेत्याने अलीकडेच एक मोठा खुलासा केला आहे. सलमान खान हा जरी तंदुरुस्त दिसत असला तरी त्याला अनेक गंभीर आरोग्य समस्या आहेत. आरोग्याशी संबंधित अनेक आव्हाने असूनही, तो सतत काम करत असल्याचे पाहायला मिळतंय.
सलमान खानला विविध आजारांची लागण झाल्याचे समोर आले आहे. सलमान खान तीन गंभीर आजारांशी झुंज देत आहे. ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ब्रेन एन्युरिझम आणि एव्ही मॅलफॉर्मेशन या मोठ्या आजारानं सलमान खानला ग्रासलं असल्याची माहिती मिळतेय. द ग्रेट इंडियन कपिल शोच्या नवीन सीझनमध्ये पहिला गेस्ट असलेल्या सलमान खानने कार्यक्रमादरम्यान त्याच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल मोठा खुलासा केल्याचे पाहायला मिळाले.

