Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो जरा जपून, समुद्राला उधाण अन् 19 वेळा भरती, पुढील 5 दिवस धोक्याचे; हवामान खात्याचा अलर्ट काय?
भरतीच्या उधाणाला आजपासून सुरूवात झाली आहे. मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी कोसळताना दिसत आहे. अशातच हवामान विभागाकडून भरतीनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईकरांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत आजपासून येत्या २८ जूनपर्यंत समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात तब्बल १९ वेळा समुद्राला भरती येणार आहे. यासह यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा २६ जून रोजी उसळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मुंबईत आजपासून २८ जूनपर्यंत सलग पाच दिवस मोठी भरती असणार आहे.
भरतीच्या पहिल्या दिवशी नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इतकंच नाहीतर ज्या-ज्या दिवशी समुद्राला भरती येईल त्या-त्या दिवशी नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आजपासून पुढील पाच दिवस समुद्राला उधाण येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस प्रशासनाकडून मुंबईकरांना अलर्ट करण्यात आलं आहे. सध्या मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर ४.२९ मीटरच्या उंच लाटा उसळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका

