AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?

बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर…., वसईत नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 13, 2025 | 3:43 PM
Share

एका पंतगाचा मांज्या त्याच्या गळ्यात अडकला आणि गळा कापला जाऊन खोल जखम झाली. त्यानंतर त्या व्यक्तीच्या गळ्याला ९ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे

पंतगाच्या मांज्याने एका व्यक्तीचा गळा कापल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. काल रविवार असल्याने आपल्या दहा वर्षाचा मुलगा आणि पत्नीसह बाईकवरुन फिरण्यासाठी जात असताना, एका पंतगाचा मांज्या त्याच्या गळ्यात अडकला आणि गळा कापला जाऊन खोल जखम झाली. त्यानंतर त्या व्यक्तीच्या गळ्याला ९ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. वसईच्या समर्थ रामदास नगर येथे राहणारे विक्रम डांगे हे आज रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपली पत्नी नितल आणि दहा वर्षाचा मुलगा प्रांशू यांच्यासह बाईकने वसईच्या मधुबन परिसरातून फेरफटका मारत होते. त्याचवेळी सायंकाळी ५,३० च्या दरम्यान मधूबनच्या एका मोकळ्या मैदानात सुरक्षा स्मार्ट सिटी मार्फत पंतग महोत्सवाच आयोजन करण्यात आलं होतं. बाईकवर जात असतानाच एका पंतगाचा मांजा त्याच्या गळ्याभोवती आवळला आणि गळ्याला चिर पडली. चिर एवढी खोल होती की, त्याच्या गळ्यावर ९ टाके पडले. पत्नीने लागलीच मांजा काढल्याने पती विक्रम डांगे याचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला.

Published on: Jan 13, 2025 03:43 PM