Sambhaji Bhide यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं केलं कौतुक; मनोज जरांगे यांना म्हणाले…
VIDEO | संभाजी भिडे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट अन् उपोषण मागे घेण्याची विनंती करत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे केले तोंडभरून कौतुक, बघा काय म्हणाले?
जालना, १२ सप्टेंबर २०२३ | जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आज पोहोचले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. संभाजी भिडे म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही करताय ते १०० टक्के योग्य करताय. एक चांगलं म्हणजे आता जे राजकारणी सत्तेवर बसले आहेत, एकनाथ शिंदे अजिबात लबाड नाहीत, देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाही आणि अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले तरी काळीज असलेला तो माणून आहे.’, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

