Sambhaji Raje | सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घेतली, सरकारपुढे 6 मागण्या ठेवल्या : संभाजीराजे

खासदार संभाजीराजे छत्रपती आणि सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. ही बैठक जवळपास अडीच तास चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अशोक चव्हाण आदी मंत्री उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती आणि सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. ही बैठक जवळपास अडीच तास चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अशोक चव्हाण आदी मंत्री उपस्थित होते. या बैठकीत बऱ्यापैकी सविस्तर चर्चा झाली. सकल मराठा समाजाने 6 मागण्या पुढे ठेवल्या होत्या. प्रामुख्यानं 17 ते 18 मागण्या आहेत. पण विषय मार्गी लागण्याच्या दृष्टीतून 6 मागण्या सरकारसमोर मांडण्यात आल्याची माहिती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI