Special Report | राज्यसभेचा संभाजीराजेंचा मार्ग कठीण ?

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपण अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मात्र, ऐनवेळी शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 23, 2022 | 10:41 PM

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणूकीवरून (Rajya Sabha Election) संभाजीराजे छत्रपती यांच्या समोर अडथळे असल्याचेच दिसून येत आहे. त्यांना शिवसेनेकडून खुली ऑफर देण्यात आली होती. मात्र संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपण अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मात्र, ऐनवेळी शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर शिवसेनेची भूमिका मांडताना राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही अपक्षांना पाठीबा देणार नाहीत. मग तो कुणीही असो. असे स्पष्ट संकेत खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी जाहीर केली. त्यावर पलटवार करताना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेची फिरकी घेतली. तसेच सहाव्या जागेवर राऊतांना पाठवा. संभाजी राजेंना अडकवायचं नसेल तर हे कराच. त्यांना राज्यसभेवर सन्मानपूर्वक त्यांना पाठवायचं असेल तर त्यांना फर्स्ट जागा द्या. तरच त्यांचा सन्मान होईल, असं रावसाहेब दानवे म्हणाले. तर मराठा आरक्षणासाच्या मुद्द्यावरून राऊत यांना छेडले असता ते भडकले. त्यावर मराठा मोर्चाकडूनही आमचा राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले होते. तर याआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना जो उमेदवार देईल त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या समोर राज्यसभेच्या निवडणूकीवरून अनेक अडचणी समोर असल्याचेच दिसत आहे.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें