Sambhajinagar : संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात, दिल्ली गेट परिसरात तणाव
Chhatrapati Sambhajinagar News : संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील सुमारे चार हजारांहून अधिक अनधिकृत मालमत्तांवर बुलडोझर फिरवला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील जालना रोड, पैठण रोड आणि पडेगाव रस्त्यावरील सुमारे चार हजारांहून अधिक अनधिकृत मालमत्तांवर बुलडोझर फिरवला आहे. सोमवार, 7 जुलै रोजी हरसुल टी पॉईंट ते सिडको बसस्थानक आणि हरसुल टी पॉईंट ते दिल्ली गेट रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई नियोजित आहे. या भागात मार्किंग पूर्ण झाले असून, साडेसहाशेपेक्षा जास्त अतिक्रमणे असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.
दिल्ली गेट ते हरसुल टी पॉईंट रस्त्यावर आज सकाळपासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. या कारवाईदरम्यान पोलिस, महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये वादावादी आणि धक्काबुक्कीच्या घटना घडल्या. दिल्ली गेट परिसरात तणावपूर्ण वातावरण असून, कारवाई सुरळीत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

