AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जायकवाडी धरणातून 9 हजार क्यूसेकने पाणी सोडले

जायकवाडी धरणातून 9 हजार क्यूसेकने पाणी सोडले

| Updated on: Jul 31, 2025 | 5:58 PM
Share

जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) ९० टक्क्यांहून अधिक क्षमतेने भरले असून, मुसळधार पावसामुळे दुपारी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) आज  90.13 टक्के क्षमतेने भरल्यामुळे दुपारी 3 वाजता ते 3.30 वाजेदरम्यान धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात 9 हजार 432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आणि उर्ध्व धरणांतून येणाऱ्या पाण्याच्या जोरदार आवक लक्षात घेता विसर्गाची आवश्यकता भासली. त्यामुळे धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात आले आहेत. पुढील काही तासांत पाण्याची आवक वाढल्यास विसर्गाचे प्रमाण वाढवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

दरम्यान, जायकवाडी धरणात 1 जून रोजी 29 टक्के पाणीसाठा होता, जो आता वाढून 90.29 टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक आणि अहमदनगरमधून आतापर्यंत 50.45 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात दाखल झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठवड्याभरात पाऊस पडल्याने डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. गेल्या वर्षी, 9 सप्टेंबर 2024 रोजी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

Published on: Jul 31, 2025 05:58 PM