Sandeep Deshpande यांची ब्रिजभूषण-शरद पवारांच्या फोटोवर खोचक टीका

त्यामध्ये “त्यांनी तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांना विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे” असा आशय लिहिला आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 24, 2022 | 12:25 PM

बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आयोध्या दौऱ्याला विरोध केल्यापासून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलं आहे. युपी यायचं असेल तर पहिली जनतेची माफी मागा, नाहीतर इथल्या साधू संतांची माफी मागा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली. त्यानंतर यामागे नेमकं कोण आहे याची चर्चा देखील राजकारणात सुरू झाली. त्यावर मनसेच्या अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधानं देखील केली आहे. भाजपचे खासदार आपल्या भूमिकेवरती ठाम राहिल्याने राज ठाकरेंना दौरा स्थगित करावा लागला. त्याबाबत आज मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये “त्यांनी तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांना विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे” असा आशय लिहिला आहे. राज ठाकरेंनी पुण्यात झालेल्या सभेत मराठी पोरांना अडकवण्यचा प्रयत्न असल्याचे जाहीर केले होते. तसेच निवडणुकीच्या तोंडावर केसेस पडण परवडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें