वंचितसोबत युती केल्याने शिवसेनेला मोठा फटका बसणार; शिंदेगटातील मंत्र्याची भविष्यवाणी
शिंदेगटातील मंत्र्याने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच चंद्रकांत खैरेंवरही निशाणा साधलाय. ते काय म्हणालेत पाहा...
औरंगाबाद : संदिपान भुमरे हा पैठणपुरता आहे का? की महाराष्ट्रापुरता आहे? हे चंद्रकांत खैरेला 2024 दाखवून देऊ, अशी गर्जना रोहयो – फलोत्पादन मंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केलीये. शिवसेना ठाकरेगटावने वंचितसोबत युती केलीय खरी पण त्याचा मोठा फटका त्यांना बसणार आहे, असंही ते म्हणालेत. शिवाय औरंगाबाद जिल्ह्यातला मतदार बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्याच शिवसेनेचा माणूस निवडून येईल, असं सांगताना भुमरे यांनी लोकसभेची तयारी करणाऱ्या भाजपलाही लोकसभेसाठी आव्हान उभे करीत औरंगाबाद लोकसभेवर दावा केलाय.
Published on: Feb 06, 2023 03:36 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

