Sandipanrao Bhumre : मंत्री भूमरेंच्या ड्रायव्हरच्या अडचणी वाढणार? आयकर विभागाने पाठवली नोटिस
150 कोटींची जमीन भेट मिळाल्या प्रकरणी मंत्री संदीपान भूमरे यांच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटिस आलेली आहे.
मंत्री संदीपान भूमरे यांच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटिस आलेली आहे. भूमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन भेट मिळाल्या प्रकरणी ही नोटिस आलेली आहे. हैद्राबादमधल्या एका व्यापाऱ्याकडून भूमरे यांच्या ड्रायव्हरला ही जमीन देण्यात आलेली होती.
खासदार आणि आमदार यांच्या ड्राइव्हरकडे १५० कोटी रुपयांची जमीन असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी झाला आहे. भूमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेख मात्र आपल्या जबाबावर ठाम आहे. यावेळी बोलताना शेख म्हणाले की, यात व्यवहार काहीही झालेले नाही. मला काही पैसे मिळाले नाही, मी काही दिले नाही मी काही दोषी नाही. माझं दुर्दैव आहे मी भुमरे साहेबांचा ड्रॉइव्हर असल्याने यात त्यांचं नाव घेतलं जात आहे. पण यात त्यांचा काही संबंध नाही, असं शेख यांनी म्हंटलं आहे. दरम्यान, सालारजंगने हिबानामा करून दिलेल्या १५० कोटींच्या जमिनीबाबत पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत खासदार संदिपान भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांची सातत्याने चौकशी सुरू आहे. ते त्यांच्या जबाबावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांची पोलिसही पुन्हा चौकशी करीत आहेत. पोलिसांच्या हाती अद्याप कोणताही ठोस पुरावा लागलेला नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार, याबद्दल उत्सुकता आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

