राज्य आणि केंद्र सरकारवर पटोले यांची टीका; म्हणाले काय झाडी काय डोंगर…
तसेच तुम्हाला काय झाडी काय डोंगरवाला आमदार आणि असं राज्य सरकार पाहीजे की आमदार रविंद्र धंगेकर यांच्या सारखा इमानदार माणूस हवा असा सवाल त्यांनी उपस्थित लोकांना केला.
सांगोला : सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या काय झाडी काय डोंगर या डायलॉगची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरु आहे. या डायलॉगवरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका केली आहे. तसेच तुम्हाला काय झाडी काय डोंगरवाला आमदार आणि असं राज्य सरकार पाहीजे की आमदार रविंद्र धंगेकर यांच्या सारखा इमानदार माणूस हवा असा सवाल त्यांनी उपस्थित लोकांना केला. तसेच जर लोकांना असा चांगला माणूस हवा असेल तर 2024 ला महाविकास आघाडीचे सरकार यायला हवं. त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत पटोले म्हणाले, गेल्या पाच महिन्यापासून राज्यात अवकाळी पाऊस पडतोय केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो सरकारची धोरणही शेतकरी विरोधीत आहेत. त्याचा परिणाम आज महाराष्ट्रातला शेतकरी भोगत आहे. अवकाळीमूळं शेतकऱ्याचे पीक चिखलात गेलं आहे. ते सांगोल्यात कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार व महाविकास आघाडीचे नेते रविंद्र धंगेकर यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थितीत होते.
Published on: May 08, 2023 08:49 AM
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
