Sanjay Rathod : भावना गवळी शिवसेनेच्या खासदार, आमच्या नेत्या आहेत, सोबत काम करत असल्याचं संजय राठोड यांचं स्पष्टीकरण

बंजारा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक मंथन होणार आहे. समाजाप्रती देणं लागतो, ही भूमिका माझी राहणार आहे. महंत या सर्व प्रकरणी खुलासा करणार आहेत, असंही राठोड म्हणाले.

गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 13, 2022 | 6:02 PM

यवतमाळ : खासदार भावना गवळी यांच्यासोबत माझे कुठलेही वाद नाहीत. त्या शिवसेनेच्या खासदार आहेत. आमच्या नेत्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात काम करू, असं स्पष्टीकरण मंत्री संजय राठोड यांनी दिलं. ते म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेऊन विकासकामांची सुरुवात करणार आहे. माझ्या मतदारसंघातही बरीच कामं करायची आहेत. जे खातं मला मिळणार त्या खात्याच्या माध्यमातून राज्यभर काम करणार असल्याचं मंत्री संजय राठोड म्हणाले. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यावर ते म्हणाले, ती दुर्दैवी घटना होती. अधिकरच भाष्य करणार नाही. माझ्यासाठी संपला आहे. माझं कुटुंब आहे. आईवडील आहेत. असा विषय काढून घरच्यांना वाईट वाटू नये. कायदेशीर माध्यमातून लढाव. बिनबुडाचे आरोप करू नये.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें