AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान

अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता… एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान

| Updated on: Aug 19, 2026 | 12:49 PM
Share

संजय राऊत यांनी अमृता फडणवीसांना देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला जाण्याची मानसिकता ठेवण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीस महाराष्ट्राची सेवा करतील या विधानावर राऊतांनी राष्ट्रसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या उदाहरणांचा संदर्भ देत, त्यांनी राष्ट्रसेवा ही राज्यसेवेच्या पलीकडची असल्याचे म्हटले.

संजय राऊत यांनी अमृता फडणवीसांना दिल्लीला जाण्याची मानसिकता ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचीच सेवा करणार असल्याचे म्हटले होते. यावर राऊत यांनी फडणवीस महाराष्ट्राचे महान सेवक असल्याचं राऊतांनी सागितलं. त्यामुळे फडणवीस कुटुंबाने दिल्ललीला जाण्याची मानसिकाता बनवावी असं राऊत यांनी स्पष्ट सांगितलं. त्यांनी प्रश्नही उपस्थित केला की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असेल किंवा राष्ट्राची हाक असेल, तर देवेंद्र फडणवीस दिल्लीला का जाऊ नयेत.

यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे अनेक नेते देशाच्या सेवेसाठी गेले आहेत. महाराष्ट्र सेवेच्या पुढे राष्ट्रसेवा असल्याचे मत त्यांनी मांडले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही आधी देश, मग राज्य अशी भूमिका स्पष्ट केली होती, असे राऊत म्हणाले. “देशाने जर मला साद घातली तर मी आधी देशासाठी प्राण देईन,” असे ठाकरे म्हणत असत, याची आठवण राऊत यांनी करून दिली. दिल्लीच्या बंगल्यात जाणे म्हणजे काही प्राणाचा त्याग करणे नाही, असे उपरोधिक विधानही राऊत यांनी केले.

Published on: Aug 19, 2026 12:49 PM

Follow Us