Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत, थेट म्हणाले…
शिवसेना ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नीट पेपरफुटी, पंतप्रधानांचे दौरे तसेच त्यांचे जनतेला आवाहन अशा अनेक विषयांवर भाष्य केले. संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या बाईकवरील प्रवासाबाबातही स्पष्टच बोलले.

राऊत म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विधानभवनात बाईकवरून जात होते, तेव्हा पूर्ण रस्ता अडवण्यात आला होता, पेपरवाले, भाजीवाले सगळ्यांना उठवले होते. भाजपच्या नेत्यांनी या ढोंगी प्रवृत्तीतून आता बाहेर पडायला हवे.’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, “अमित शहा यांनी त्यांचा ताफा कमी केला का? दिल्लीतले तीन रस्ते केवळ त्यांच्या सुरक्षेसाठी बंद असतात. मग तुम्ही कसल्या ताफे काढण्याच्या गोष्टी करताय?” असेही संजय राऊतांनी विचारले.
पुढे पत्रकाराने जेव्हा विचारले की, ‘मोदींच्या परदेश दौऱ्यावर आक्षेप आणणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस बिनडोक म्हणतात’ त्यावर कोणताही विचार न करता राऊत म्हणाले, ‘होय, आम्ही बिनडोक… मात्र आक्षेप करणारंच…कारण स्ट्रॅटेजीच्या नावाखाली किती दौरे कराल तुम्ही?’
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...