पोपटलाल बिनविरोध म्हणून नाचू लागले; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना टोला
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना "महाराष्ट्राचा शत्रू" संबोधत मराठीविरोधी भूमिकांचा आरोप केला. मुलुंड वॉर्ड १०७ मध्ये नील सोमय्या बिनविरोध झाल्याचा दावा फेटाळत, उद्धव ठाकरे गटाने दिनेश जाधव यांना अधिकृत उमेदवार घोषित केले आहे. राऊत यांनी भाजपला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती केल्याबद्दल पश्चात्ताप होत असल्याचा दावाही केला.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या आणि भाजपवर जोरदार टीका केली. राऊत यांनी किरीट सोमय्या यांना “महाराष्ट्राचा शत्रू” आणि “मराठी द्वेष्टा” म्हटले. त्यांच्या शालेय शिक्षणातील मराठी सक्तीला विरोध, तसेच मराठी उद्योजकांविरोधात अमित शहा यांच्या सांगण्यावरून मोहीम उघडल्याचा आरोप राऊत यांनी केला. भारतीय जनता पक्षात भ्रष्टाचारी गेल्यावर किरीट सोमय्यांचे तोंड शिवले गेल्याचेही ते म्हणाले.
राऊत यांनी मुलुंड वॉर्ड क्रमांक १०७ मधील निवडणुकीच्या संदर्भातही भाष्य केले. नील सोमय्या बिनविरोध निवडून आल्याचा दावा त्यांनी फेटाळला. राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रह धरल्याने ही जागा त्यांना देण्यात आली होती. मात्र, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव यांना अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात कांटे की टक्कर होणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. दिनेश जाधव यांना दूरदर्शन संच हे चिन्ह मिळाले आहे. राऊत यांनी सर्व भाषिक मुंबईकर या महाराष्ट्र द्वेष्ट्याविरुद्ध एकवटून दिनेश जाधव यांचा विजय करतील, असा विश्वास व्यक्त केला.
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला

