Sanjay Raut Video : “त्यांनी या राज्याची वाय झेड करून टाकली”, सुरक्षेच्या मुद्द्यावरून संजय राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
राज्य सरकारने ज्यांना धोका नाही अशा सर्व पक्ष नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. सर्व आमदारांना आता फक्त एकच सुरक्षा रक्षक असेल. मंत्र्यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा मात्र तशीच राहणार आहे. प्रतापराव चिखलीकर, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, कृष्णा गजभिये, देवराम होळी यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून संजय राऊत आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये […]
राज्य सरकारने ज्यांना धोका नाही अशा सर्व पक्ष नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. सर्व आमदारांना आता फक्त एकच सुरक्षा रक्षक असेल. मंत्र्यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा मात्र तशीच राहणार आहे. प्रतापराव चिखलीकर, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, कृष्णा गजभिये, देवराम होळी यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून संजय राऊत आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी महायुती सरकारवरच हल्लाबोल केलाय. “त्यांनी या राज्यात वाय झेड करून टाकली आहे. हे वेड्यांचे सरकार आहे. हे मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे, मंत्रालयात गोंधळ आहे. प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. गृहनिर्माण खात्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. एसआरए, म्हाडामध्ये अधिकाऱ्याची नेमणूक संबंधित मंत्र्यांना रोकड देऊन केली जाते. लवकरच कोणत्या प्रकल्पासाठी किती पैसे दिले गेले, याची माहिती मी उघड करेन” असा इशारा संजय़ राऊत यांनी दिला. यानंतर भाजपच्या प्रसाद लाड यांनी राऊतांवर निशाणा साधत आता वाय झेड कोण आहे? हे महाराष्ट्राने त्याला आणि त्याच्या बॉसला दाखवून दिले. त्यामुळे त्याच्या भाषेत आता मला पवित्र तिरूपती भूमित बोलायचं नाही नाहीतर वाय झेडची स्पष्टता देखील मी तुम्हाला दिली असती, असे म्हटले.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
