Bihar Election Results 2025 : कल येताच राऊत म्हणाले, एकदम महाराष्ट्र पॅटर्न… धक्का बसण्याची गरज नाही..
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर संजय राऊत यांनी महाराष्ट्रासारखाच पॅटर्न असे ट्विट करत टीका केली आहे. एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले असून, भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघात काट्याची टक्कर सुरू असतानाही ते 585 मतांनी आघाडीवर राहिले. विकास आणि महिलांच्या मतांमुळे एनडीएला कौल मिळाल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “बिहारच्या निकालांना धक्का बसण्याची गरज नाही, बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न” असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, सत्तेवर येणाऱ्या आघाडीला 50 च्या आत संपवले, असा टोला त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपा राष्ट्रीय कार्यकर्त्यांना उद्देशून लगावला.
एकीकडे राऊतांच्या टीकेचे सत्र सुरू असतानाच, बिहारमध्ये एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपला 90 जागांवर, तर जेडीयूला 80 जागांवर आघाडी मिळाली. तर, दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव त्यांच्या राघोपूर मतदारसंघात भाजपचे सतीश कुमार यांच्याशी काट्याची टक्कर देत होते. काही काळ पिछाडीवर पडल्यानंतर तेजस्वी यादव पुन्हा 585 मतांनी आघाडीवर आले. भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष करत लाडू वाटप आणि घोषणाबाजी सुरू केली. बिहारमधील जनतेने विकासाला महत्त्व देत एनडीएला कौल दिला, असे भाजप नेत्यांनी नमूद केले.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

