Sanjay Raut : विरोधकांना चिरडण्याची पद्धत हिटलरपेक्षाही भयंकर, संजय राऊतांची भाजपवर टीका
राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला परिचीत आहे.
लखनौ : राज्यात सध्या शिवसेना (Shivsena) आणि भाजपमधील (BJP) संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला परिचीत आहे. रोज होणारी टीका टिप्पणी देखील आता रोजची झाली आहे. यात पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. देशात केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत विरोधकांना त्रास देण्याचा कार्यक्रम सुरु आहे. ही हुकुमशाहीची (Dectetoeship) सुरुवात नाही तर हुकुमशाहीचं टोक म्हणावलं लागेल. विरोधकांना चिरडण्याची ही पद्धत हिटलरपेक्षाही भयंकर आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यवरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray in Ayodhya) देखील अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत अयोध्येत आहेत. यावेळी पत्रकारांना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातील कार्यक्रम स्पष्ट केला.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

