‘उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला ते शिंदेंचे आमदार फोडायला गेलेत’, कोणाचा हल्लाबोल?
'राजकारण आम्ही करत नाही ठाकरे उबाठाचे पक्ष प्रमुख आहे. उद्धव ठाकरेच शिवसेनेचे नेतृत्व करतात. शिंदे मध्येच टपकले. जोपर्यंत अमित शाह आहे. तोपर्यंतं त्याचा अवतार आहे. तो तात्पुरता आहे.', असे म्हणत राऊतांनी शिंदेंवर टीका केली.
उदय सामंत हे भटकती आणि लटकती आत्मा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यानंतर संजय राऊत यांच्याकडून हे प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘उदय सामंत हे दावोसमध्ये बसून एकनाथ शिंदे यांना कोण भेटतंय ते सांगतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांना दावोसमधून परत महाराष्ट्रात पाठवून द्यावं’, असं खोचकपणे संजय राऊत यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांचे 4 आमदार आणि 3 खासदार हे एकनाथ शिंदेंना भेटले असा दावा उदय सामंत यांनी केला होता. त्यावरूनच संजय राऊत यांनी हे टीकास्त्र सोडलं आहे. या दाव्यानंतर संजय राऊत संतापले आणि उदय सामंतांना असं प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. ‘उद्या एकनाथ शिंदे हे मोदींना नकोसे होतील. देवेंद्र फडणवीसांना नकोसे झालेच आहेत. मी भाजपचं अंतरंग माझ्याइतकं कोणीच ओळखणार नाही. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन आणि लालकृष्ण अडवाणी होते तोपर्यंत आमचं बरं चाललं होतं. पण गेल्या दहा वर्ष प्रत्येक दिवस दिल्ली आणि महाराष्ट्रात शिवसेनेविरोधात कटकारस्थान करण्यासाठी गेला.’, असा हल्लाबोलही राऊतांनी केला.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
