Sanjay Raut RS LIVE | गंगेत फेकलेल्या मृतदेहांवरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका

गंगेत मृतदेह फेकून त्यांची विटंबना केली असल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आहे. केंद्र सरकारने कोरोनाबाधितांचे आकडे लपवले, मृतांचे आकडे लपवले, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

गंगेत मृतदेह फेकून त्यांची विटंबना केली असल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आहे. केंद्र सरकारने कोरोनाबाधितांचे आकडे लपवले, मृतांचे आकडे लपवले, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, पेगासस प्रकरणावरुनही त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. पेगासस प्रकरणाचा जो भांडाफोड झाला आहे. त्यावरून या देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं उघड झालं आहे. हा देशाशी धोका आहे. देशातील जनतेशी धोका आहे. ही हेरगिरीच नाही तर विश्वासघातही आहे, असं सांगतानाच आम्ही या मुद्द्यावर संसंदेत आवाज उठवू. हिंमत असेल तर सरकारने आमच्याशी या मुद्द्यावर चर्चा करावी, असं आव्हानच शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलं आहे. पेगासस प्रकरणावरून शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आजही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर हल्ला चढवला. पेगासस प्रकरण उघड झाल्याने देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (Sanjay Raut criticize Modi government over dead bodies thrown in the Ganges)