Sanjay Raut : शेतकऱ्यांची कर्जमाफी अन् लाडक्या बहिणींचे 2100 कधी मिळणार? राऊतांनी महायुतीला घेरलं
महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या आश्वासन आणि जाहीरनाम्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवरच हल्लाबोल केलाय.
‘महायुतीने वचन दिलंय की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रूपये देण्यात येतील, असा जाहीरनामा होता. पण लाडक्या बहिणींचे २१०० रूपये दिले नाही तर आहे ते पण कमी केले. आता अजित पवार अर्थमंत्री म्हणताय असं कोणतंही आश्वासन दिलं नाही’, असं म्हणत राऊतांनी महायुती सरकारला धारेवर धरलं.
पुढे ते असेही म्हणाले, कर्जमाफीची घोषणा कधी करणार? शेतकऱ्यांच्या १ लाख आत्महत्यापूर्ण झाल्यावर? खरं आता गरज आहे कर्जमाफीची पण सरकार निवडणुकीच्या दोन महिनेपूर्वी कर्जमाफीची घोषणा करणार जसं लाडकी बहिणीची घोषणा केले होती, असं म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकार शेतकरी, लाडकी बहीणींना आणि नागरिकांना फसवतात. आतापर्यंत हे सरकार आल्यापासून वर्षभरात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याचं कारण कर्जमाफी असल्याचे राऊत यांनी स्पष्टपणे म्हटलंय.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक

उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम

अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?

मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
