मंत्रालयाजवळचं झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची 100 प्रकरणं टपाटप खाली पडतील- संजय राऊत
ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. तसंच शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. पाहा...
मुंबई : ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. तसंच शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. “मंत्रालयाबाहेरचं झाड जर हलवलं तर शिंदे सरकारची भ्रष्टाचाराची 100 प्रकरणं टपाटप खाली पडतील”, असं संजय राऊत बोललेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. त्यावरूनही संजय राऊतांनी टीका केली आहे. जे मंत्रिमंडळ विस्तार करू शकले नाहीत, ते सरकार स्थिर कसं?, असा सवाल राऊतांनी केलाय. देशातील राजकारणाची स्थिती आणीबाणीपेक्षाही गंभीर आहे. मनीष सिसोदिया यांना अटक झाली आहे. या कारस्थानाचा सुगावा आधीच लागला होता, असंही राऊत म्हणालेत.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

