आनंद दिघे असते तर… आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमातील एक व्हिडीओ समोर आला आणि राज्यातील राजकारणात खळबळ उडली. आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. जो सध्या व्हायरल होतो.
आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आनंद आश्रमातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यानंतर विरोधक शिंदेंच्या शिवसेनेवर चांगलेच निशाणा साधल आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक होत त्यांनी याप्रकऱणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ठाण्यातील आनंद आश्रमातील व्हिडिओ अत्यंत विचलित करणारा आहे. तो व्हिडिओ पाहून आम्ही अस्वस्थ झालो आहोत. एक धिंगाणा त्या वास्तूमध्ये आम्ही पाहिला आहे. लुटीचा पैसे तिथे ठेवला जातो का? लुटीच्या पैशांतून असे प्रकार केले जात आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पुढे राऊत असेही म्हणाले की, आश्रमात त्या ठिकाणी एक हंटर लावण्यात आले आहे. आनंद दिघे असते तर तो हंटर काढून लुटीचा पैसे उधळणाऱ्या लोकांना फोडून काढले असते. आनंद दिघे असे वागणाऱ्यांचा समर्थन करत नव्हते. तसेच जे आनंद दिघे यांना गुरू मानतात ते सुद्धा प्रकार करु शकत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.