AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | रोखठोक संजय राऊत मवाळ झाले?

Special Report | रोखठोक संजय राऊत मवाळ झाले?

| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 10:55 PM
Share

कोरोना पसरवण्याचे पाप काँग्रेसने केले असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, याबाबत संजय राऊत यांना विचारले असता प्रत्येकवेळी बोलण्याचा ठेका मी एकट्यानेच घेतला आहे का? काँग्रेसने टीकेला प्रत्युत्तर द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल केलेल्या भाषणामुळे उठणारी राजकीय आरोपांची राळ निवडणुकीच्या तोंडावर वाढलीय. मात्र, दुसरीकडे भाजपवर आपल्या शेलक्या शब्दांत प्रहार करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता मात्र, एकट्यानेच बोलायचा ठेका घेतलाय का, म्हणत भाजपने पुढे येऊन बोलावे असे आवाहन केले आहे. राऊत यांनी आज दिल्ली येथे माध्यमांधी संवाद साधला. ते म्हणाले की, पंतप्रधानांचं भाषण मी ऐकलं, वाचलं. भाषण मोदी यांच होतं, पण त्यांनी महाराष्ट्राबाबत वक्तव्य केलं म्हणून महाराष्ट्र सरकारकडून त्याचा खुलासा व्हावा. मला हे ऐकून वाईट वाटलं. महामारीचा उगम चीनमधून झालाय. त्याचं महाराष्ट्र खापर फोडणं योग्य नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नची वाहवा केली. महाराष्ट्रामुळे महामारी आली म्हणजे हा सरकार, डॉक्टर, नर्स यांचा अपमान आहे. आता भाजपच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत पुढं येऊन बोलायला हवं. आम्ही एकट्यानेच बोलायचा ठेका घेतलाय का, असा टोलाही त्यांनी लगावला.