भाजपसोबत जाण्यासाठी पवार कुटुंबातील सदस्यावर दबाव; पवार-ठाकरे भेटीत चर्चा, संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; भाजपसोबत जाण्यासाठी पवार कुटुंबातील सदस्यावर दबाव, संजय राऊतांचा मोठा खुलासा पाहा व्हीडिओ...
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी दरम्यानच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. आजच्या सामनाच्या रोकठोक सदरातून संजय राऊत यांनी या भेटीतले मुद्दे मांडलेत. भाजपसोबत जाण्यासाठी कुटुंबातील सदस्यावर दबाव आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. ज्याला जायचं आहे ते वैयक्तिक निर्णय घेऊ शकतात. पण पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असं शरद पवार म्हणाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचा ‘सीझन-2’ येणार काय? यावर चर्चा सुरू आहेत. शिंदे गटाचे 16 आमदार बाद होतील. त्याची भरपाई म्हणून राष्ट्रवादीचे आमदार फोडले जातील. अजित पवारांपासून हसन मुश्रीफांपर्यंत ‘ईडी’चा ससेमिरा लावला गेला आहे. त्याचा शेवट काय होणार?, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

