“शिंदे यांची सेना ही मोदी यांची शवसेना”, शिवसेनेच्या जाहिरातीवरून संजय राऊत यांचा निशाणा
शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. आता या जाहिरातीवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.
मुंबई : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. आता या जाहिरातीवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. “शिवसेनेच्या जाहिरातीत नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला आहे, पण बाळासाहेबांचा फोटो नाही. शिवसेना ज्यांचे नाव घेत आहे, त्या बाळासाहेबांचा फोटो यामध्ये नाही. मग ही शिवसेना कोणाची? शिंदेंची सेना ही मोदींची सेना आहे. शाहा यांची सेना आहे. यामुळे त्यांचा खरा मुखवटा उघड झाला आहे. ही तर मोदी यांची ‘शवसेना’ आहे”, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. “कोट्यवधींच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा उल्लेख कसा नाही? एकनाथ शिंदे आनंदाच्या क्षणी बाळासाहेबांना कसे विसरले?” असा प्रश्न त्यांनी विचारला. “तसेच सर्वेक्षण कुठे झाले, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात झाले की गुजरातमध्ये झाले”, असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?

