शिवसेनेतील ‘त्या’ आमदार, खासदारांना ठाकरे पुन्हा सोबत घेणार?, संजय राऊत म्हणतात, “अशा लोकांसाठी…!”
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. यादरम्यान अनेक घडामोडी घडल्या. परंतु शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदार आणि खासदारांना उद्धव ठाकरे पुन्हा सोबत घेणार का?
मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. यादरम्यान अनेक घडामोडी घडल्या. परंतु शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदार आणि खासदारांना उद्धव ठाकरे पुन्हा सोबत घेणार का? याची चर्चा अजूनही जोरात आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. “उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, बेईमानी केली. ज्यांनी केवळ पैशासाठी बेईमानी केली त्यांना परत पक्षात प्रवेश देणार नाही. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यावे लागेल. त्यांच्यात रोष आहे. त्यामुळे या गद्दारांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते मेसेज करतात, भेटतात. वेदना बोलून दाखवतात. पण तरीही त्यांना प्रवेश देणार नाही”, असं राऊत यांनी सांगितलं.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

