AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut| मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut| मतदारांवर दबाव आणण्यासाठी… बंगाल निवडणुकीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

| Updated on: Apr 27, 2026 | 10:52 AM
Share

पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुका झाल्या असून राज्यात मोठ्या संख्येत सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अनेक मोठे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते आणि त्यांनी मतदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील बंगालला गेले होते. यावर आता संजय राऊतांनी मोठं विधान केलं आहे.

पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुका झाल्या असून राज्यात मोठ्या संख्येत सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

नुकतीच उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘बंगालच्या निवडणुकीत इतके जवान, सशस्त्र पोलीस दल का तैनात केले जात आहेत? मतदारांवर दबाव आणण्यासाठी भाजप हे करत आहे का? सशस्त्र पोलीस दल मणिपूरला पाठवा, या सगळ्यांची तिथे खरी गरज आहे. ममता दीदी बरोबर बोलत आहेत. तुम्ही ज्या राज्यात निवडणूक आहे तिथे दौरे करता मात्र ज्या राज्यामध्ये अशांतता आहे तिथे जात नाही.’

Published on: Apr 27, 2026 10:52 AM
Follow Us