Sanjay Raut | US-Isreal-Iran War | संजय राऊतांनी चक्क इराणचं केलं तोंडभर कौतुक; म्हणाले ‘या देशाकडून…
गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. यावर तुमचं मत काय विचारताच संजय राऊतांनी स्पष्ट मत मांडलं. तसेच इराणचं तोंडभर कौतुकही केलं. नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. लवकरच युद्ध थांबणार आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध विरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. यावर तुमचं मत काय विचारताच संजय राऊतांनी स्पष्ट मत मांडलं. तसेच इराणचं तोंडभर कौतुकही केलं. नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
माध्यमांशी बोलतना संजय राऊत म्हणाले, ‘आखाती देशातील शेकडो लोकं मारले गेले. यामधील महत्त्वाची बाब म्हणजे इराण हा अमेरिका, इस्त्रायलसारख्या महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांना शरण गेला नाही. या देशांना त्याने झुंझवत ठेवलं, इतकेच नाही तर जगाच्या मनात जी भीती होती या महासत्तांची ती भीतीदेखील इराणने मोडून काढली.’ पुढे राऊत म्हणाले, ‘देशातील राजकीय नेत्यांनी, नागरिकांनी देशासाठी कसं लढावं हे इराणने जगाला दाखवून दिलं.’
Published on: Apr 08, 2026 11:03 AM
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग

