AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | राज ठाकरे आमच्याकडूनच शिकून गेले!-TV9

Special Report | राज ठाकरे आमच्याकडूनच शिकून गेले!-TV9

| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 9:23 PM
Share

संजय राऊतांनी यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज ठाकरे आमच्याकडूनच शिकून गेले असे राऊत म्हणाले आहेत.

मुंबईः महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांना मराठी पाट्या न लावण्याची सूट आता कायद्यातील पळवाट म्हणून वापरता येणार नाही. सरसकट सर्व दुकानांच्या पाट्या आता मराठी भाषेत असतील, असतील, अशी सुधारणा आता यासंदर्भातील कायद्यात केली जाणार असून या प्रस्तावाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra Government) मंजुरी दिली. याचं श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचं आहे. ते लाटण्याचा आचरटपणा कुणीही करू नये, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. तसेच राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होऊ द्या, अशी सूचना केली आहे. तर आता संजय राऊतांनी त्यांना टोला लगावला आहे. राज ठाकरे आमच्याकडूनच शिकून गेले असे राऊत म्हणाले आहेत.