Sanjay Raut : धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut On Ravindra Dhangekar : कसबा विधानसभेचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काल शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या या पक्ष प्रवेशाबद्दल मोठा दावा केला आहे.
रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने त्यांनी पक्ष सोडला, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे. पुण्याच्या कसबा विधानसभेचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काल कॉंग्रेसला जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यावरून आज राऊत यांनी शिंदे गट आणि उॉमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, रविंद्र धंगेकर चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी मी विकास कामे करण्यासाठी शिंदे गटात जात असल्याचं सांगितलं. त्यांची कोणती शैक्षणिक की समाज उपयोगी कामे थांबली आहेत म्हणून निघाले? शिंदे गटात, अजित पवार यांच्या पक्षात हे जे प्रवेश सुरू आहेत हे प्रवेश भितीपोटी सुरू आहेत. धंगेकरांनी सांगायला हवं, खरोखर कामासाठी गेलो की कसबा मतदारसंघात गणेश पेठेत एक जागा आहे, ही प्रतिभा रविंद्र धंगेकर आणि पार्टनर इतरांच्या नावावर आहे. त्या जागेची किंमत ६० कोटी रुपये आहे. ही जागा विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुक काळात भाजपने मुस्लिम समाजातील काही लोकांना हाताशी धरुन भाजपची लोक कोर्टात गेले. त्यात त्यांचं काम अडवण्यात आलं, प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवली, त्यामुळे यांचे प्रिय रविंद्र धंगेकर शिवसनेला प्यारे झाले, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
