Sanjay Raut News : .. तर एव्हाना आमच्या निषेधाचे मोर्चे निघाले असते; राज ठाकरेंच्या विधानावरून राऊतांचा भाजपवर टोला
Sanjay Raut On BJP : राज ठाकरे यांनी महाकुंभ आणि गंगाजलबद्दल केलेल्या विधानानंतर आता खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अन्य कोणी यावर बोललं असतं तर भाजपने थयथयाट केला असता असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर भाजपने थयथयाट केला असता, असा टोला उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महाकुंभच्या स्नान आणि गंगाजलबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राऊत यांनी हा टोला लगावला आहे.
मनसेच्या वर्धनपदिनाच्या कार्यक्रमात काल राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांनी महाकुंभमधून आणलेल्या गंगाजलबद्दल बोलताना उपरोधक विनोद करत गंगेच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना आज संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे भाजपचे सहकारी आहेत. मधल्या काळात राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे. अचानक ते हिंदुत्ववादी झाले. राज ठाकरे यांच्या जागी इतर कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, कॉंग्रेसचा असता, शरद पवार यांच्या गटाचा किंवा आमचा नेता असता तर या विधानावर भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसनेने थयथयाट केला असता. मी राज ठाकरे यांच्या विधानावर माझं मत व्यक्त करत नाही. पण हेच दुसरं कोणी बोललं असतं तर भाजपच्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी एव्हाना रस्त्यावर येऊन यांच्या निषेधाचे मोर्चे काढले गेले असते, असं राऊत यांनी म्हंटलं आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
