Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊतांच्या जामिनावर आज सुनावणी, जेल की बेल?
Sanjay Raut : यापूर्वी ईडीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी छगन भुजबळांना 2 वर्ष एक महिना आणि 21 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं.
मुंबई: आज राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडी (ED) कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की तुरुंगातच राहावे लागणार हे पाहावे लागणार आहे. राऊत यांना गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी राऊत यांची तब्बल 16 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर दुसऱ्या दिवशी राऊत यांना आधी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जेजेत वैद्यकीय चाचणी केल्यानंतर दुपारी त्यांना कोर्टात (court) हजर करण्यात आलं होतं. यावेळी ईडीकडून राऊत यांच्या सात दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. राऊत यांच्या वकिलाने त्याला विरोध केला होता. त्यानंतर कोर्टाने राऊत यांना तीन दिवसाची ईडी कोठडी सुनावली होती.
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद

