Sanjay Raut : राज्याचे अर्थमंत्री कारखान्याचे चेअरमन बनतात हे ऐतिहासिक; संजय राऊतांची टोलेबाजी
Sanjay Raut On Malegaon Sakhar Karkhana Result : माळेगाव साखर कारखाना निवडणुकीवरून खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
एका कारखान्याचे चेअरमन राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनतात हे ऐतिहासिक गोष्ट आहे. 500 कोटी रुपयांचे आमिष दाखवले. हे 500 कोटी रुपये अजित पवार आपल्या खिशातून देत आहेत का? असा खोचक प्रश्न खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका करत उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पॅनलला बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठे यश मिळालं आहे. 21 पैकी 20 जागांवर अजित पवार यांच्या पॅनलचा विजय झाला आणि शरद पवारांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यावर आज प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राऊतांनी ही टीका केली आहे.
यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की, हे 500 कोटी रुपये तुम्ही सरकारच्या तिजोरीतूनच देणार आहात. बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहेत. त्याला पैसे नाहीत, राज्यावर कर्जाचा भार वाढतोय. पण, आपल्या एका गावातल्या कारखान्यासाठी ते पाचशे रुपये कोटी रुपये द्यायला तयार आहेत. यालाच साध्या सोप्या भाषेत सरकारी पैशाचा अपव्यय आणि भ्रष्टाचार म्हणतात, अशीही टीका राऊत यांनी केली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

