Sanjay Raut : मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; संजय राऊतांनी विरोधकांना धारेवर धरलं
Sanjay Raut Press Conference : खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकावर होणाऱ्या टीकेवरून विरोधकांना फटकारलं आहे.
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळली आहे. मर्यादेत राहील तेवढेच या पुस्तकात लिहिलं आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. ‘नरकातला स्वर्ग’ या त्यांच्या पुस्तकावरून भाजपकडून राऊतांवर टीका होतं आहे. त्यावर आज माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत राऊत यांनी सत्ताधारी पक्षांना चांगलच फैलावर धरलं.
पुढे राऊत म्हणाले की, आजचे भाजपचे नेते बोलत आहेत त्यांना काय माहिती? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो. यापेक्षा असंख्य घटनेचा मी साक्षीदार आहे. मी प्रदीर्घकाळ बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलो आहे. त्यामुळे अनेक गोष्टी मला माहिती आहे. मात्र मी त्या कधीही लिहिणार नाही आणि बोलणार देखील नाही. ‘नरकातला स्वर्ग’ हा वेगळा प्रवास आहे, असं म्हणत तुरुंगातल्या भिंतींशी आपण बोलतो तेव्हा आपल्याला अनेक संदर्भ आठवतात. मात्र त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो. घाबरून पळून जावे लागत नाही, असा टोला देखील संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

