Sanjay Raut : रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता भरत गोगावलेंना टोला
Sanjay Raut On Raigad Guardian Ministery : रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री पदाबाबत आज खासदार संजय राऊत यांनी भाष्य करताना नाव न घेता भरत गोगावले यांना टोला लगावला आहे.
आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. युवा नेतृत्व आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हा चेहरा योग्य आहे. रायगडसारख्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपद हे गावगुंडाकडे असता कामा नये, असा टोला उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भरत गोगावले यांचं नाव न घेता लगावला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, रायगडसारख्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपद हे संयमाने काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला हवं. आदिती तटकरे यांना जिल्हा पूर्णपणे माहिती आहे. संयमी असून त्या भ्रष्ट नाहीत आणि आता आलेले प्रगतीपुस्तकामध्ये त्यांना ग्रेड चांगले मिळाले आहेत. जो भ्रष्टाचाराच्याविरूद्ध ठामपणे उभा राहिल, मला असं वाचतं तटकरे चांगला चेहरा त्यांच्याकडे आलं असेल तर स्वागत करतो, असं म्हणत संजय राऊत यांनी नाव न घेता भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

