Sanjay Raut Uncut PC | पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार म्हणत, संजय राऊतांचे भाजपवर गंभीर आरोप
देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे मोठ्या वादात सापडली आहे. या प्रकरणानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी NEET पेपरफुटी प्रकरणामागे भाजप नेत्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला. “या संपूर्ण गैरव्यवहाराला आणि त्यामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना भाजपचे लोकच जबाबदार आहेत,” असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच, “सध्याचे राज्यकर्ते कोण आहेत? या प्रकरणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे,” असेही राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरणासोबतच व्हीआयपी सुरक्षा आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, या प्रकरणामुळे देशभरात शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या गंभीर मुद्द्यावरून राजकारणही तापले आहे.
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....