Sanjay Raut : काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदीवर निशाणा
काश्मीरातील हिंदू जीव वाचवण्यासाठी आपल्या मुलाबाळांना घेऊन पलायन करतायत. एवढंच नव्हे तर देशासाठी लढणाऱ्या , देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय मुस्लिम सैनिकांच्या हत्या केल्या जात आहेत. अन तुम्ही कसली सरकारची आठ वर्षे साजरी करताय असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
मुंबई – काश्मिरी पंडितांवर(Kashmiri Pandit) होता असलेल्या हल्ल्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काश्मिरी पंडितांवर होत असलेले हल्ले हे पंतप्रधान मोदी यांचे अपयश आहे. काश्मिरीपंडित रक्ताच्या थारोळ्यात असताना मोदी सरकार (Modi Government) काश्मीर फाईल्स चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त असल्याचीटीका राऊत यांनी केली आहे. मशीद शिवलिंग शोधणारे काश्मीरच्या मुद्द्यावर गप्प का ? असा सवाल राऊत (sanjay Raut)यांनी केला आहे. काश्मीरातील हिंदू जीव वाचवण्यासाठी आपल्या मुलाबाळांना घेऊन पलायन करतायत. एवढंच नव्हे तर देशासाठी लढणाऱ्या , देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय मुस्लिम सैनिकांच्या हत्या केल्या जात आहेत. अन तुम्ही कसली सरकारची आठ वर्षे साजरी करताय असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा

