Sanjay Raut | पंतप्रधान रात्री कोणता केक कापतात हे बघावं लागेल : संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी शुभेच्छा देतानाच त्यांचं भरभरून कौतुकही केलं. मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभलं. भाजप कायम आघाड्या करून सत्तेत येत होता. वाजपेयींनंतर त्यांनी भाजपला शिखरावर नेलं, असं ही राऊत म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी शुभेच्छा देतानाच त्यांचं भरभरून कौतुकही केलं. मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभलं. भाजप कायम आघाड्या करून सत्तेत येत होता. वाजपेयींनंतर त्यांनी भाजपला शिखरावर नेलं. मोदींच्या नेतृत्वात भाजप एकहाती सत्ता घेऊन आली. त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिलं. ही त्यांच्या नेतृत्वाची कमाल आहे. त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही, असं राऊत म्हणाले. मोदींचं तोंडभरून कौतुक करतानाच मोदी संध्याकाळी कोणता केक कापतात, ते पाहावं लागेल, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काढला.
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

