मनोज जरांगे हा फाटका माणूस, संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी, संजय राऊत म्हणतात,…
जरांगे पाटील यांना स्वतःला काही मिळवायचं नाही. तो फाटका माणूस आहे. तो कुणाला शरण जाणार नाही. ते त्यांच्या समाजासाठी लढतात. त्या फाटक्या माणसाच्या मागे महाराष्ट्रातील संपूर्ण समाज उभा आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ : उद्या शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे जळगाव येथे पोहचतील. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. जळगाव महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण ठेवलं. ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावं अशी त्यांची भूमिका आहे. पुतळ्याच्या भूमिपूजनाला गेले होते. तेव्हा सांगितलं होतं की मी पुतळ्याच्या उद्घाटनाला येईन. ही त्यांची वचनपूर्ती आहे. यात टीका टिपण्णी करावं असं काय आहे. जे टीका करतात. हे उद्धव ठाकरे यांना विरोध करत नसून छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. कार्यक्रमाला तुम्हीसुद्धा या. हजारो लोकं येतील. उद्या सभा होईल. उद्धव ठाकरे येतील. बैठक झाली आहे. कशाकरिता परवानगी नाकारता. महापालिकेचा कार्यक्रम आहे. अंबादास दानवे तिथं पोहचले आहेत. जळगावात काही गोंधळ निर्माण करण्याची तर तो तुमचा प्रश्न आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात गावागावात लोकं बाहेर पडतात. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद् घाटनाला विरोध कशासाठी, असंही संजय राऊत म्हणाले. मनोज जरांगे पाटील हा फाटका माणूस आहे. फाटकी माणसं आंदोलनात उतरतात. एखादी गोष्ट ठरवतात. तेव्हा त्यांना त्यांच्या विचारापासून दूर ठेवणं हे कठीण आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

