ठाकरे गटाच्या मोर्चावर संजय शिरसाट यांची टीका; म्हणाले, “आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठे नाही, भ्रष्टाचार…”
ठाकरे गटाचा उद्या म्हणजे 1 जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा आहे. याचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मुसळधार पावसात मोर्चा काढणार असल्याचा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. त्यावर आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत सुचक वक्तव्य केले आहे.
औरंगाबाद : ठाकरे गटाचा उद्या म्हणजे 1 जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा आहे. याचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मुसळधार पावसात मोर्चा काढणार असल्याचा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. त्यावर आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत सुचक वक्तव्य केले आहे. “मुंबई महापालिकेत गेली 25 वर्षे ठाकरेंनीच भ्रष्टाचार केला. अन् तरीही आम्ही भ्रष्टाचार विरोधात हे म्हणायचं धाडस कसं होतं? आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं पाहिजे मुंबईची अवस्था अशी का झाली? आपला उद्याचा मुक्काम जेलमध्ये असणार हे आदित्य ठाकरे यांना माहीत आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आदित्य असो किंवा कुणीही असो,” असं संजय शिरसाट म्हणाले.

